“काय झालं, कसं झालं, सगळं लवकरच शेअर करु…”, अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या लग्नाची गोष्ट

By  
on  

महाराष्ट्राची अप्सरा सोनाली कुलकर्णी सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. गेले काही दिवस सोनाली पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकणार अशा चर्चांना उधाण आलं हौतं. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त सोनाली पती कुणालसोबत पुन्हा बोहल्यावर चढली. 

सोनाली कुलकर्णीने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने एक फोटो शेअर केला आहे. यात सोनाली आणि कुणाल असे लिहिले आहे. त्यासोबत अखेर आम्ही सर्व मराठमोळ्या पध्दतीने विधीपूर्वक  केलं, असेही लिहिले आहे. या फोटोला तिने हटके कॅप्शनही दिले आहे.

 

 

सोनाली कुलकर्णीची इन्स्टाग्राम पोस्ट

“pandemic मुळे दोन वेळा postpone करून तिसऱ्यांदा cancel करावा लागला आमचा लग्न सोहळा. मग दुबईत अडकल्यामुळे किमान आता register marriage करून टाकू असं ठरवलं. आमच्या आई वडील, कुटुंबियांना travel करता नाही आलं. Zoom call वरून साक्षीदार झाले. पुढे जेव्हा परिस्थती सुधारेल तेव्हा सगळे एकत्र येऊ आणि celebrate करू अश्या आशेवर, गेल्या वर्षी ७.०५.२०२१ ला आम्ही court marriage केलं.

यंदा, आमच्या पहिल्या wedding anniversary ला आम्ही सह कुटुंब – सह परिवार – ठरल्या प्रमाणे – संपूर्ण विधीपूर्वक – मराठमोळ्या पद्धतीने – अगदी स्वप्नवत – लग्न केलं. P.S. काय काय झालं, कसं झालं, कुठे झालं, सगळं – सगळं share करू “लवकरच” ! तुमचा आशिर्वाद आणि प्रेम नेहमी प्रमाणे राहू द्या”, असे तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

 

आता  चाहत्यांना तिच्या लग्नाचे फोटो पाहण्याची उत्सुकता लागून राहिली आहे. 

 

Read More
Tags
Loading...

Recommended