सलमानला लागलं मराठीचं 'वेड', झळकतोय रितेश देशमुख दिग्दर्शित सिनेमात

By  
on  

२० वर्ष अभिनय कारकीर्द गाजवल्यानंतर अभिनेता रितेश देशमुख मराठीत आपल्या दिग्दर्शनाने वेड लावण्यासाठी सज्ज आहे. तर अभिनेत्री म्हणून त्याची पत्नी जिनिलिया देशमुख या सिनेमाद्वारे मराठीत पदार्पण करतेय. यांच्यासोबतच  या सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणजे मराठी सिनेसृष्टीचे अष्टपैलू अभिनेते महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. या शिवाय सिनेमात बॉलिवूडचा दबंग खान म्हणजेच सलमान खान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकतोय. सलमानला निशिकांत कामत दिग्दर्शित लय भारी सिनेमानंतर पुन्हा एकदा मराठीत पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 

रितेश देशमुख दिग्दर्शित 'वेड' सिनेमाच्या एका खास गाण्यात सलमान खान झळकणार आहे. या खास गाण्याची शूटींग लवकरच सुरु होणार आहे. जिनिलिया देशमुखसोबतच अभिनेत्रीन जिया शंकर या सिनेमात प्रमुख भूमिकेत आहे. अजय-अतुल या प्रसिध्द संगीकार जोडीने या सिनेमातील गाण्याचं संगीत दिग्दर्शन केलंय. रितेशही ह्या सिनेमात एका हटके भूमिकेतून समोर येत आहे.. 

रितेश देशमुख दिग्दर्शित 'वेड' हा सिनेमा येत्या 12 ऑगस्ट2022 रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. 

Read More
Tags
Loading...

Recommended