'हे असं छापणं चूक', एकनाथ शिंदे साकारणारा अभिनेता संतापला

By  
on  

सध्या महाराष्ट्राचं राजकारण तापलं आहे. राज्यातील चालू परिस्तिथीपासून कोणीही अनभिद्न्य नसल्याने त्यावर वेगवेगळी मतं आणि अभ्यास मांडला जात आहे.असं असताना सध्य परिस्थितीवर मीम्सही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर हा सिनेमा अलिकडेच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यात आनंद दिघेंचा शिष्य व  उजवा हात मनला जाणा-या एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेतून अभिनेता क्षितीश दातेने सर्वांची मनं जिंकली. त्यांच्यासारखं  हुबेहूब रूप, त्यांची देहबोली सगळीच क्षितीशने आत्मसात केली होती. त्याच्या या भूमिकेसाठी प्रचंड कौतुक झालं. 

अशातच एका वृत्तपत्राने सुद्धा या मिम्सला आपल्या बातमीत अंतर्भूत केल्याने क्षितीश चांगलाच संतापलेला दिसतो आहे. क्षितीशचा एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेतला फोटो असलेलं हे मीम असून यात “थोडे दिवस मलाच एकनाथ समजून बैठकीत घ्या’ असं लिहिलेलं आहे. यावर क्षितीशन सोशल मीडियावर स्टोरी टाकत असं लिहिलं आहे, “हे असं छापणं चूक आहे. राज्यात मोठी उलाढाल चालू असताना चेष्टेने मिम्स येणं वेगळं आणि ते वर्तमानपत्रात छापून येणं वेगळं” असं म्हणत क्षितीशने आपलं मत व्यक्त केलं आहे.

Read More
Tags
Loading...

Recommended