'तुझ्या माझ्या संसाराला' फेम अभिनेत्री अमृता पवार लवकरच अडकणार विवाहबंधनात!

By  
on  

झी मराठी वरील 'तुझ्या माझ्या संसारला आणि काय हवं?' या मालिकेतील आदिती म्हणजेच अभिनेत्री अमृता पवार हिचा नुकताच साखरपुडा संपन्न झाला आहे. तिच्या मित्रपरिवाराने सोशल मीडियावर साखरपुडयाचे फोटो शेअर करत तीला शुभेच्छा दिल्या होत्या.

आता अमृता पवार लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. याबद्दल तिने कुठेही अधिकृतपणे माहिती दिली नसली तरी अमृताने तिच्या सोशल मीडियावर एक खास फोटो शेयर केला. या फोटोच्या कॅप्शन मध्ये तिने 'Few days until our happily ever after begins...' असं म्हटलं आहे. त्याचबरोबर तिने तिच्या होणाऱ्या नवऱ्याला टॅग देख केलं आहे.

 

 

यावरून अमृता लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान तिच्या या फोटोवर मराठी कलाविश्वातील अनेक कलकरांनी आणि तिच्या मित्रपरिवाराने तसेच अमृताच्या चाहत्यांनी कमेंट्स करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

अमृताच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव नील पाटील नाव असुन तो बायोमेडिकल इंजीनियर आहे. ४ एप्रिल २०२२ ला अमृताचा साखरपुडा संपन्न झाला असुन ते दोघेही लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. 

दरम्यान अमृता सध्या ‘तुझ्या माझ्या संसाराला..' या मालिकेत अदितीची भूमिका साकारतेय. यामध्ये तिच्यासोबत हार्दिक जोशी मुख्य भूमिकेत आहे. अमृताने याआधी 'स्वराज्यजननी जिजामाता' या मालिकेत जिजामातांची भूमिका साकारली होती.

Read More
Tags
Loading...

Recommended