दौलतरावांसाठी सई ताम्हणकरची खास पोस्ट ; वाढदिवसाच्या दिल्या रोमॅंटिक शुभेच्छा!

By  
on  

मराठी कलाविश्वातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून सई ताम्हणकरला ओळखले जाते. सई ताम्हणकर हिने नाटक, मालिका, सिनेमा, वेबसिरीज अश्या अनेक माध्यमांत काम करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. सई ताम्हणकर ही इंडस्ट्रीत तिच्या बिनधास्तपणामुळे ओळखली जाते. त्याचबरोबर ती तिच्या खाजगी आयुष्यबद्दल देखील उघडपणे बोलते.

सई ताम्हणकरने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर अनिष जोगचा फोटो शेयर करत तिच्या प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर अनेकवेळा तिने तिचं प्रेम उघडपणे व्यक्त केलं आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sai (@saietamhankar)

नुकताच सईने अनिष जोगच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या सोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेयर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा फोटो पोस्ट करताना तिने 'तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा, तुझी सर्व स्वप्ने आणि इच्छा पूर्ण होवोत' असं कॅप्शन मध्ये म्हटलं आहे. त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

अनिश जोग हा मराठी सिनेनिर्माता असून त्याने आतापर्यंत त्यांनी अनेक नावाजलेल्या सिनेमांची निर्मिती केली आहे. धुरळा, गर्लफ्रेंड, मुरांबा, वायझेड, टाइमप्लिज या सिनेमांचीही त्यांनी निर्मिती केली आहे. नुकत्याच झालेल्या सईच्या वाढदिवसानिमित्त अनिष जोग यानेदेखील तिला खास व्हिडिओ शेयर करत शुभेच्छा दिल्या होत्या.

Read More
Tags
Loading...

Recommended