'आपल्या हातून देव घडतोय, याचं अप्रुप वाटलं' ; अभिनेत्री कुंजिका काळवीटने शेयर केला बाप्पा बनवतानाचा व्हिडीओ

By  
on  

'ती परत आलीय' मधून प्रसिध्दीस आलेली अभिनेत्री म्हणजे कुंजिका काळविंट. मराठी मालिकांमधून काम करत कुंजिकाने स्वतःचा चाहतावर्ग निर्माण केला आहे. त्याचबरोबर कुंजिका सोशल मीडियावर पोस्ट शेयर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. 

कुंजिकाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती गणेश मूर्ती तयार करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना तिने कॅप्शनही दिलं आहे. तिने लिहलंय, “साध्या मातीला येणारं देवपण श्रध्देने जागृत होतं, त्या मूर्तीचं तेज म्हणजे प्रत्यक्ष मुर्तीकाराने कलेपोटी त्यात फुंकलेले प्राण! कलेचं सौंदर्य समृद्ध असतं त्यात आव नाही तर असतो तो निर्मळ भाव… दरवर्षी ख्यातनाम मूर्तिकार ‘मादुस्कर गणपती’कडून आमच्या घराची मूर्ती तयार होते. पण, यावर्षी ती घडवण्याचा प्रयत्न आपण करावा असं ‘मादुस्कर गणपती’चे गणेश मादुस्कर यांनी सुचवले आणि बाप्पाने ते प्रत्ययास आणून घेतलेच!”

पुढे तिने लिहलंय की, "मूर्त्यांच्या साच्यांपासून, त्याच्या हात-पायाला आकार देणे, त्याच्या आसनासाठीचे सिंहासन, त्याच्या हातावरचा मोदक, त्याचे भावपूर्ण, तेजस्वी पण अतिशय प्रेमळ डोळे हे सगळं साकारताना आपल्या हातून देव घडतोय ह्याचं खूप अप्रूप वाटलं.”

दरम्यान कुंजिकाचा या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट करत कुंजिकाचं कौतुक केलं आहे. कुंजिकाच्या या व्हिडीओवर कमेंट्स आणि लाइक्सचा अक्षरशः पाऊस पडला आहे. कुंजिकाने ‘स्वामिनी’ मालिकेत खलनायकी भूमिका साकारली होती. पण ‘ती परत आलीये’ या मालिकेतून ती घराघरात पोचली.

Read More
Tags
Loading...

Recommended