अभिनेत्री विशाखा सुभेदारचा 'हास्यजत्रा' कार्यक्रमाला कायमचा रामराम ; चाहत्यांना धक्का

By  
on  

आपल्या विनोदी अभिनयानं प्रेक्षकांना हसायला भाग पाडणारी अभिनेत्री म्हणजे विशाखा सुभेदार. महाराष्ट्राची हास्यजत्रा या लोकप्रिय कार्यक्रमातून विशाखाने अनेक विनोदी पात्र साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

मात्र काही महिन्यांपूर्वी विशाखाने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम सोडण्याचा निर्णय घेतला होता, हास्यजत्रा’ हा कार्यक्रम सोडण्याविषयी एक फेसबुक पोस्ट लिहित तिने याचं कारण सांगितले होते. त्यानंतर अनेक प्रेक्षकांना धक्का बसला होता. ती 'हास्यजत्रा’ कार्यक्रमाच्या पुढच्या पर्वात पुन्हा दिसू शकते असे बोललं जात होतं. पण आताही विशाखा सुभेदार नव्या पर्वाचा भाग नसणार आहे.

एका प्रसिद्ध वेबपोर्टलनुसार, विशाखा सुभेदार ही ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या नव्या पर्वात सहभागी होणार नाही. तिने या कार्यक्रमाला कायमचा रामराम केला आहे. त्यामुळे ती या कार्यक्रमाच्या नव्या भागात झळकणार नाही.

दरम्यान हास्यजत्रा कार्यक्रमाच्या नव्या प्रोमोजमध्ये कार्यक्रमातील अनेक कलाकार दिसत आहेत, पण या नवीन पर्वच्या प्रोमोजमध्ये विशाखा सुभेदार कुठे दिसत नाहीये, त्यामुळे विशाखाने हास्यजत्रा कार्यक्रमाला कायमचा रामराम केल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. येत्या १५ ऑगस्ट पासून हास्यजत्राचं नवीन पर्व सुरू होणार असून या पर्वात काय पाहायला मिळणार यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

Read More
Tags
Loading...

Recommended