वैभव मांगले म्हणतो, 'मी चिंची चेटकीणीचं काम सोडलं आहे... '

By  
on  

मराठी बालनाट्यात अलबत्या गलबत्या हे प्रचंड प्रसिध्द झालेलं नाटक. अभिनेता वैभव मांगलेनं आपल्या अभिनयानं आणि दमदार संवादानं हे नाटक एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. लहान मुलांचा या बालनाट्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत होता. नाटकातील चिंची चेटकीण वैभव मांगलेनं लिलया सांभाळत रसिक प्रेक्षक व छोट्या दोस्तांची मनं जिंकली. पण हीच चिंची चेटकीण आता नाटकात आपल्याला पाहता येणार नाही. म्हणजेच वैभव हे नाटक सोडत असल्याचं त्यानं जाहीर केलंय. त्याच्या जागी आता दुसरा अभिनेता चिंचीची भूमिका साकारणार आहे. 

वैभव इन्स्टाग्रामवर म्हणतो, प्रिय रसिक प्रेक्षक आणि बालमित्रांनो मैत्रिणींनो मी चिंचि चेटकीणीच काम सोडलं आहे . तरी जाहिरातीतला फोटो माझा आहे असे वाटून कदाचित माझी चेटकीण पाहायला याल आणि भ्रमनिरास होईल. तर सांगायचा मुद्दा हा आहे कि "ती मी नाहीच "

 

 

त्याचप्रमाणे वैभव मांगलेनं हे नाटक सोडल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. ज्यात निलेश गोपनारायण हे चेटकीणीच्या भूमिकेत आहेत. नवी चेटकीण हुबेहूब वैभव मांगलेनं साकारलेल्या चेटकीणीसारखी दिसत आहे.

 

Read More
Tags
Loading...

Recommended