पाहा Video : गणेश आचार्य आणि अभिनेत्री हिना पांचाळ करणार 'राडा'

By  
on  

साऊथ स्टाईल कमालीची ऍक्शन आणि कॉमेडी आणि सोबत रोमँटिक सीन्सचा भरणा असलेल्या 'राडा' सिनेमा येत्या २३ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. 'राडा' सिनेमाची सध्या सोशल मीडियावर चांगलीच हवा सुरू आहे. अशातच चित्रपटातील एक नवं कोर  'मैनाचा पोपट झाला' हे गाणे रसिक प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. 'राडा' चित्रपटातील या आयटम सॉंगमध्ये आपले सर्वांचे लाडके मास्टरजी गणेश आचार्य आणि अभिनेत्री, नृत्यांगना हिना पांचाळ यांची जुगलबंदी पाहणं रंजक ठरेल आणि हे गाणं त्याच्या ठेक्यावर थिरकायला नक्कीच भाग पाडेल यांत शंका नाही. अवघ्या काही दिवसांतच आता रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेण्यासाठी 'राडा' सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्याच्या वाटेवर आहे. 

राम शेट्टी निर्मित 'राडा' या सिनेमाचा हिरो समा म्हणजेच अभिनेता आकाश शेट्टी तुप्तेवार 'राडा' या सिनेमातून सिनेविश्वात पदार्पण करत आहे. तर राम शेट्टी निर्मित, रमेश व्ही. पारसेवार आणि सुप्रिम गोल्ड प्रस्तुत, सूरज फिल्म अँड एंटरटेनमेंट बॅनरचा आणि सहनिर्माता वैशाली पेद्दावार व पॅड कॉर्प - पडगीलवार कॉर्पोरेशन यांच्या या चित्रपटात आकाश शेट्टीसह मिलिंद गुणाजी, संजय खापरे, गणेश यादव, अजय राठोड, गणेश आचार्य, निशिगंधा वाड,  योगिता चव्हाण, सिया पाटील, हिना पांचाळ, शिल्पा ठाकरे या कलाकारांना पाहणे रंजक ठरणार आहे. याशिवाय चित्रपटात आपले सर्वांचे लाडके विनोदवीर लच्छु देशमुख यांच्या अभिनयाची जादूही पाहायला मिळणार आहे. दिग्दर्शक रितेश सोपान नरवाडे यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन, संवाद आणि स्क्रीनप्ले अशा तीनही धुरा पेलवल्या आहेत. तर चित्रपटातील 'मैनाचा पोपट झाला' या गाण्याच्या संगीताची जबाबदारी दिनेश अर्जुना यांनी सांभाळली असून गाण्याचे बोल जाफर सागर लिखित आहे. तर गायक उर्मिला धनगर आणि जसराज जोशी यांनी या गाण्याला सुरबद्ध केले आहे. उर्मिला आणि जसराजच्या आवाजातील आणि त्याला मास्टरजी आणि हिनाच्या नृत्याची जोड मिळताच या गाण्याची शोभा अधिकच द्विगुणित झाली आहे. तर या सुपर ऍक्शनपटाचे चित्रीकरण के. प्रवीण याने त्याच्या कॅमेऱ्यात कैद केले आहे.  

Read More
Tags
Loading...

Recommended