अनिकेत विश्वासराव एक्स पत्नीसह झळकणार ‘बिग बॉस मराठी 4’मध्ये, चर्चांना उधाण

By  
on  

छोट्या पडद्यावरचा सर्वात लोकप्रिय रिएलिटी शो जो नेहमी वादग्रस्त ठरतो तो म्हणजे बिग बॉस मराठी. यंदा त्याचं ४ थं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 2 ऑक्टोबरला बिग बॉस मराठीचा प्रिमीयर आहे. त्यामुळे प्रिमीयर पूर्वी घरात यंदा कोणते सेलिब्रिटी स्पर्धक म्हणून दिसणार याबाबतची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. पर्वासाठी कोणकोणते स्पर्धक सहभागी होणार याबद्दल विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यातच आता एका वादग्रस्त अभिनेत्याचे नाव समोर येत आहे.  अभिनेता हार्दिक जोशी, किरण माने यानंतर आता आणखी एका अभिनेत्याला बिग बॉससाठी विचारणा करण्यात आली आहे.अभिनेता अनिकेत विश्वासराव हा बिग बॉस मराठीच्या घरात जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. फक्त एकटा अनिकेत नाही तर त्याची पत्नी अभिनेत्री स्नेहा चव्हाण बिग बॉसच्या घरात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अनिकेत आणि त्याची पत्नी स्नेहा चव्हाण यांचा अलिकडेच घटस्फोट झाला आहे. 2018 साली अनिकेत आणि स्नेहा यांनी लग्नगाठ बांधली होती. एका सिनेमाच्या शूटींगदरम्यान त्यांच्यात प्रेम फुललं. प्रेमाचं रुपांतर लग्नात झालं. नोव्हेंबर २०२१ दरम्यान अनिकेतची पत्नी अभिनेत्री स्नेहा विश्वासरावने पती, सासू आणि सासरे यांच्यावर कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाण केल्याची तक्रार पोलिसात दाखल केली.स्नेहाने याबाबत पुण्यात तक्रार दाखल केली होत. त्यामुळे या प्रकरणाची बरीच चर्चा रंगली होती. 

Read More
Tags
Loading...

Recommended