Photos : प्रवाह पिक्चरच्या रेड कार्पेटवर कलाकारांचा ग्लॅमर अंदाज

By  
on  

 

डिस्ने स्टार नेटवर्कची प्रवाह पिक्चर ही मराठी चित्रपटांची वाहिनी अल्पावधीतच लोकप्रिय ठरली आहे. दर्जेदार मराठी सिनेमांची मेजवानी सादर करत असतानाच प्रवाह पिक्चर वाहिनी भेटीला घेऊन येणार आहे प्रवाह पिक्चर पुरस्कार २०२२.

मराठी कलाविश्वातील दिग्गजांच्या उपस्थितीत नुकताच प्रवाह पिक्चर पुरस्कार सोहळा २०२२ पार पडला. या सोहळ्यासाठी मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गजांनी हजेरी लावली. प्रवाह पिक्चर पुरस्कारांचं हे पहिलंच वर्ष. मराठी सिनेमे, त्यातील कलाकार, तंत्रज्ञ मंडळी यांच्या चमकदार कामगिरीची दखल घेणारा हा सोहळा लवकरच प्रवाह पिक्चर वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

प्रवाह पिक्चर पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता – अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट गायक-गायिका, सर्वोत्कृष्ट गीतकार, सर्वोत्कृष्ट छायाचित्रण, सर्वोत्कृष्ट कथा, सर्वोत्कृष्ट पटकथा, सर्वोत्कृष्ट संवाद, सर्वोत्कृष्ट छायाचित्रण, सर्वोत्कृष्ट संकलक, सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञ, सर्वोत्कृष्ट ध्वनीयोजना, सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट वेशभूषा, सर्वोत्कृष्ट रंगभूषा, सर्वोत्कृष्ट साहसदृश्य दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट पात्र योजना, सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत, सर्वोत्कृष्ट गीत, सर्वोत्कृष्ट बालकलाकार, सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकार (पुरुष-स्त्री) आणि सर्वोत्कृष्ट खलनायक, प्रवाह पिक्चर विशेष पुरस्कार, अश्या विभागांमध्ये पुरस्कार जाहीर करण्यात आले.

या पुरस्कार सोहळ्याच्या परीक्षणाची जबाबदारी पार पाडली आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री रेणुका शहाणे, प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक किरण यज्ञोपोवित, ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते, ज्येष्ठ छायाचित्रकार महेश आणे, ज्येष्ठ पत्रकार-लेखक श्रीकांत बोजेवार. प्रवाह पिक्चर वाहिनीवर लवकरच प्रवाह पिक्चर पुरस्कार सोहळा पाहायला मिळणार आहे. 

Read More
Tags
Loading...

Recommended