पाहा 'वेड'चं गाणं : समुद्रकिनारी जिनिलिया नाही तर जिया शंकर सोबत रितेश देशमुखचा रोमान्स

By  
on  

रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांच्या 'वेड' चित्रपटाचा टिझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला.  त्यांच्या चित्रपटातील पहिले गीत ' वेड तुझा ' आज प्रदर्शित झाले आहे . हे गीत अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिया शंकर यांच्यावर चित्रित झालेले आहे .अजय अतुल ने संगीतबद्ध केलेले आणि अजय गोगावले यांच्या आवाजातील हे गाणं खरच मंत्रमुग्ध  करणार आहे.‘वेड तुझा’ असं या चित्रपटामधील गाण्याचं नाव आहे. “वेड तुझा विरह वणवा” असे या गाण्याचे बोल आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांच्या मुंबई फिल्म कंपनीला 10 वर्षे पूर्ण झाले आहेत .”वेड' ही त्यांची सहावी चित्रपट निर्मिती आहे. मुंबई फिल्म कंपनीने आता "देश म्यूजिक” हे म्युझिक लेबल लाँच केले आहे.या चित्रपटाद्वारे अभिनेत्री जिनिलिया देशमुख मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. या पूर्वी जिनिलीयाने हिंदी, तेलगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम अशा ५ भाषिक चित्रपटांमध्ये काम केले आहे .

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, विद्याधर जोशी तसेच अभिनेता शुभंकर तावडे आणि अभिनेत्री जिया शंकर इत्यादी कलाकार या चित्रपटात भूमिका साकारत आहेत. संगीतकार अजय अतुल यांनी वेड चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केली आहेत.

Read More
Tags
Loading...

Recommended