मराठमोळ्या गश्मिरची बॉलिवूड एन्ट्री,या अभिनेत्रीसोबत करतोेय स्क्रीन शेयर

By  
on  

मराठीसोबतच हिंदीतही आपल्या अभिनयाचा ठसा अटकेपार उमटवणा-या कलाकारांच्या यादीत आता आणखी एक नाव सामील झालं आहे, ते म्हणजे अभिनेता गश्मिर महाजनीचं. मराठीतला हा हॅण्डसम हंक गश्मिर लवकरच बॉलिवूडच्या सिनेमात झळकतेय. मराठी सिेनेमातली त्याच्या अभिनयाची जादू सर्वांनाच माहितीय. अभिनयासोबत तो उत्तम डान्सरही आहे. नुकताच तो डान्स महाराष्ट्र डान्सच्या परिक्षकपदी विराजमान होता. तसंच झलक दिखला जा’ या शोमध्येही स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. आपल्या नृत्य कौशल्याची छाप सर्वांवर पाडतो या चित्रपटाच्या फिनालेपर्यंत पोहोचला. त्याच्या डान्सचं अनेक दिग्गजांनी कौतुक केलं. या शोमुळे त्याचा चाहता वर्ग आणखीनच वाढला. आता तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करायला सज्ज झाला आहे.

गश्मीरच्या या पहिल्या बॉलीवूड सिनेमाचं नाव आहे ‘छोरी २.’ यात तो अभिनेत्री नुसरत भरूचाबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसेल. हा एक स्त्रीप्रधान आणि सस्पेन्स सिनेमा आहे. या सिनेमाचा पहिला भाग २०२१ साली प्रदर्शित झाला होता.

छोरीच्या दुस-या भागात गश्मिर महाजनी आपल्या अभिनयाची काय जादू दाखवतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

Read More
Tags
Loading...

Recommended