नांदा सौख्य भरे! राणादा आणि पाठकबाई अडकले रिअल लाईफ लग्नबंधनात

By  
on  

तुझ्यात जीव रंगला या मालिकेमुळे तमाम महाराष्ट्राच्या गळ्यातील ताईत बनलेले सेलिब्रिटी कपल हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर आज 2 डिसेंबर रोजी लग्नबंधनात अडकले. सर्वांचचं लक्ष या लाडक्या जोडीच्या लग्नसोहळ्याकडे लागलं होतं. दोघांच्याही हळदी, मेहंदी आणि संगीत सोहळ्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर वा-याच्या वेगाने व्हायरल झाले. 

हार्दिक व अक्षयाने लग्नाच्या विधींसाठी खास लूक केला आहे, दोघंही विधी लूकमध्ये फारच सुंदर दिसत आहेत. अक्षयाने लाल रंगाची नऊवारी साडी परिधान केली आहे. तसेच या लूकसाठी तिने परिधान केलेले दागिने तर विशेष लक्षवेधी आहेत.

मुंडावळ्या बांधलेले हार्दिक आणि अक्षया खुपच गोड दिसतायत. मेड फॉर इच अदर अश ाया जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.

Read More
Tags
Loading...

Recommended