Photos : नववधू पाठकबाईंची ओढणी ठरली लक्षवेधी, तुम्ही पाहिलीत का?

By  
on  

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणा-या पाठकबाई आणि राणादा ही रील लाईफ जोडी रिअल लाईफ लग्नबंधनात अडकल्याने चाहते भलतेच खुश झाले. 1 डिसेंबर रोजी पुण्यात हा शाही लग्नसोहळा पार पडला. मेहंदी, हळद, संगीतपासून ते लग्न -रिसेप्शन, वरात सर्वांचेच फोटो सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाले. गेला संपूर्ण आठवडा याच लग्नाचीच सर्वत्र चर्चा होती. 

अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी या जोडीने पारंपारिक वेषभूषा केली होती. 

अक्षयाने परिधान केलेल्या या पारंपारिक लूकमध्ये तिने डोक्यावर घेतलेल्या ओढणीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. ही ओढणी नेटची आहे. यावर छान डिझाईन पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे यावर सदा सौभाग्यवती भव:!! असेही लिहिण्यात आले आहे. यामुळे तिची ही ओढणी सध्या चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे.

अक्षयाने तिच्या या ओढणीबरोबर काही फोटोही शेअर केले आहेत. या फोटोत ती कमालीची सुंदर दिसत आहे. तिच्या या पारंपारिक लूक पाहून अनेक चाहते तिच्या प्रेमात पडले आहे. या फोटोला कॅप्शन देताना ‘॥ सदा सौभाग्यवती भवः ॥’ असे तिने म्हटले आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

Read More
Tags
Loading...

Recommended