''घरातले २ कोपरे...'', म्हणत प्राजक्ताने शेअर केली 'ती' पोस्ट

By  
on  

आपल्या बहुरंगी अभिनयाने, सूत्रसंचालन, नृत्याने प्रेक्षकांना आपलंस करणाऱ्या प्राजक्ता माळीने अल्पावधीतच आपली एक वेगळी छबी निर्माण केली. ‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेतून प्राजक्ताला लोकप्रियता मिळाली. त्यानंतर  तिची अभिनयाची गाडी सुस्साट सुटली.अभिनेत्री प्राजक्ता माळी ही सोशल मिडीयावर सतत चर्चेत असते. आत्तासुध्दा प्राजक्ताने एक खास पोस्ट शेयर करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. प्राजक्ताने आत्तापर्यंत अनेक पुरस्कारांवर नाव कोरलं आहे. परंतु तिला नुकतंच एका खास पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. 

‘तेजस्वी चेहरा’ हा पुरस्कार देऊन प्राजक्ताचा गौरव करण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्यानंकर प्राजक्ताने काही फोटो शेअर करत तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट ‘तेजस्वी चेहरा’ हा पुरस्कार देऊन प्राजक्ताचा गौरव करण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्यानंकर प्राजक्ताने काही फोटो शेअर करत तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केलीय.

 

प्राजक्ताने ट्रॉफी ठेवलेल्या घरातील कोपऱ्याचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला तिने “घरातले २ कोपरे कौतूकानं भरत चाललेत ह्याचा खूप आनंद आहे…(फोटोत दुसरा दिसत नाहीये.) परवा “झी युवा सन्मान २०२३ तेजस्वी चेहरा पुरस्कार” मिळाला. पाठीवर कौतुकाची थाप मिळाली की प्रोत्साहन मिळतं, उत्साह वाढतो…#कृतज्ञ #आनंद #धन्यवाद…श्रेय: आई- वडील, ध्यान, प्राणायाम, योगा आणि हास्यजत्रेला..”, असं कॅप्शन दिलं आहे.

चाहत्यांनी प्राजक्ताच्या या पोस्टवर लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव सुरु केला आहे. 

Read More
Tags
Loading...

Recommended