असा आहे सुबोध भावेचा 'संत तुकाराम' सिनेमातील फर्स्ट लुक

By  
on  

ताज डिव्हाईडेड बाय ब्लड या वेबसिरीजमध्ये बिरबल ही ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारल्यानंतर सुबोध भावे आता बॉलिवूडमध्ये झळकतोय. आगामी हिंदी सिनेमात तो पौराणिक व्यक्तिरेखा साकारतोय. संत तुकारामांच्या व्यक्तिरेखेत सुबोधला पाहता येणार आहे. त्याच्या नावावर हा आणखी एक बायोपिक नोंदवला जाणार आहे. खुद्द सुबोधनेच याबाबत इन्स्टाग्रामवर ही माहिती दिली. नुकतंच याचा पहिला लूक प्रदर्शित करण्यात आला आहे.

 

सुबोध भावेची पोस्ट

“संत तुकाराम”

आज “संत तुकाराम” या आमच्या आगामी हिंदी चित्रपटातील “तुकाराम महाराज” यांच्या वेशातील माझं पहिलं छायाचित्र तुमच्या समोर सादर करत आहे.

ही अद्वितीय व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मला दिल्याबद्दल माझे दिग्दर्शक आदित्य ओम यांचा मी कायमचा ऋणी आहे.

तुकाराम महाराज साकार करण्यामागे एक फार छान गोष्ट आहे.ती यथावकाश कथन करीन.

माझे निर्माते आणि संपूर्ण संघाचे मनपूर्वक आभार.

आता कोठे धावे मन,तुझे चरण देखीलिया!”, असे कॅप्शन त्याने या फोटोला दिले आहे.

 

 

सुबोधला हिंदी बायोपिकमध्ये आणि तेसुध्दा महान संत तुकारामांच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 

Read More
Tags
Loading...

Recommended