बिग बॉस मराठी फेम मेघा घाडगे म्हणते, "कोणते आणि कसे कपडे घालायचे याचा ..."

By  
on  

प्रसिध्द लावणी नृत्यांगना आणि अभिनेत्री मेघा घाडगे नेहमीच चर्चेत असते. नुकतीच मेघा बिग बॉस मराठी सीझन ४ मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाल्या होत्या. मेघा सोशल मीडियावर कायमच विविध पोस्ट शेअर करत असते. आता ती तिच्या एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे.  तिने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे.

नुकतंच तिने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने तिच्या कपड्यांवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर भाष्य केले आहे.

 

मेघा घाडगेची फेसबुक पोस्ट

“मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात कोणते आणि कसे कपडे घालायचे याचा सर्वस्वी अधिकार आणि सामाजिक भान मला आहे आणि बहुतेक हे सर्वांनांच असत. नाही का ?? जिथे बोलायला आणि comment करायला हवी तिथे मात्र तोंड आणि बुद्धी जाणूनं बुजून बंद ठेवता तेव्हा तुमचे संस्कार पाणी त्यायला जातात.

मी माझी रंगमंचावरील जबादारी कोणतही राजकारण न करता चोख पार पाडते . तिथे मला बंधन आहेत . पण माझ्या खाजगी आयुष्यात डोकवायला आणि बोलायला कोणालाही मी अधिकार दिलेले नाहीत . तर कृपया जगा आणि जगुद्यात”, असे मेघा घाडगेने म्हटले आहे.

 

Read More
Tags
Loading...

Recommended