“मी रोज सकाळी ८:३० वाजता जेवतो” संकर्षण कऱ्हाडेच्या पोस्टची रंगलीय चर्चा

By  
on  

अभिनेता संकर्षण क-हाडे रंगभूमीवरील दमदार आणि आजच्या पिढीला रुचणारी नाटकं घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येतो. पण त्याचबरोबर त्याच्या निवेदनाच्या हटके शैलीमुळेसुध्दा तो खास प्रसिध्द आहे. आम्ही सारे खवय्ये या महाराष्ट्रातल्या तमाम गृहिणींचा आवडता पाककलेचा कार्यक्रम तो जबरदस्त सादर करतो. अभिनयासोबतच त्याच्या या कार्यक्रमामुळे तो संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका बनलाय. 

संकर्षण सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. आगामी प्रोजेक्ट्सबरोरच अनेकदा तो कुटुंबियांबरोबरचे फोटोही शेअर करताना दिसतो. सध्या संकर्षणने केलेल्या एका पोस्टची चर्चा रंगली आहे. संकर्षणने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन जेवणाच्या ताटाचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत दररोज सकाळी ८:३० वाजता जेवत असल्याचा खुलासा करत आश्चर्याचा धक्का दिला आहे. 

 

पोस्टमध्ये संकर्षण कऱ्हाडे म्हणतो…

मी तुम्हाला आज एक गंमत सांगतो…मी वयाच्या ७ व्या वर्षी पासून आजपर्यंत रोज सकाळी ८ः३० वा. जेवतो.. पोट्टभर..माझे बाबा बॅंकेत होते. आता रिटायर्ड झाले. ते बरोबर ८.४०ला घरातून निघायचे..कधीच त्यांची वेळ चुकली नाही आणि ८.३०ला पान वाढायची माझ्या आईची वेळ कधी चुकली नाही.

आजही शूट असेल, नसेल…सकाळी लवकर जायचं असेल नसेल…मला सकाळी ८.३० वाजले की पोटभर भूक लागते…आणि मी पोटभर जेवतोच…
आज आईने साधं वरण भात, हिरव्या टोमॅटोची भरलेली भाजी, वांग्याचं भरीत वाढलं. अहो, काय सांगू कसं वाटलं…मनसोक्तं हानलं बघा…माझ्या आईच्या हातचं काहीही अप्रतिमच लागतं..सहज शेअर करावं वाटलं

 

 

 

Read More
Tags
Loading...

Recommended