सोनाली बेद्रेंवर जडला होता पाकिस्तानी क्रिकेटरचा जीव, पाकिटात ठेवायचा फोटो

By  
on  

क्रिकेटर्स आणि अभिनेत्री यांचं सूत जुळण हे फार पूर्वीपासून चालत आलं आहे. त्यांच्या अफेअरच्या, लग्नाच्या चर्चा नेहमीच रंगतात. अनेक इव्हेंट्स दरम्यान क्रिकेटच्या सामन्यांदरम्याान ह्यांची ओळख होते व ओळखीचं रुपांतर प्रेमात होतं. असाच एक कोणालाही माहित नसलेल्या एका प्रेमप्रकरणाबद्दल सध्या चर्चा रंगतेय. ती म्हणजे पाकिस्तानचा प्रसिध्द क्रिकेटपटू शोएब अख्तरचा अभिनेत्री सोनाली बेंद्रेवर जीव जडला होता आणि त्याने तिला प्रपोज करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

शोएब अख्तरला सोनाली खुप आवडायची. त्याच्या पाकिटात तिचा फोटोसुध्दा होता. वेळा त्याच्या सहकारी खेळाडूंनीही तिचा फोटो, त्याच्या पाकिटात पाहिला होता. इतकंच नव्हे तर एका मुलाखतीत खुद्द शोएबनेच त्याला सोनाली खूप आवडते, अशी कबुली दिली होती. भारत-पाकिस्तानच्या एका सीरिजदरम्यानही त्यांची भेट झाली होती. पण शोएबचे हे प्रेम एकतर्फी होते, कारण सोनालीकडून असं नाही नव्हतं.

 

दरम्यान, आता दोघेही विवाहित आहेत. सोनाली बेंद्रेने २००२ मध्ये दिग्दर्शक गोल्डी बहलशी लग्न केले तर शोएबने २०१४ मध्ये रुबाब नावाच्या पाकिस्तानी मुलीशी लग्न केले होते.

सोनाली सध्या ‘इंडिया बेस्ट डांसर ३’ मध्ये परीक्षक म्हणून दिसत आहे.

Read More
Tags
Loading...

Recommended