Video : झणझणीत सावजी मटण खाऊन क्रांती रेडकरची अशी झाली अवस्था

By  
on  

आपल्या कमाल ह्युमरमुळे प्रसिध्द असलेली अभिनेत्री क्रांती रेडकर नेहमीच चर्चेत असते. सोशल मिडीयावर क्रांतीचे धम्माल रील्स प्रचंड व्हायरल होतात. रोजच्या जीवनात घडणा-या घडामोडींवर, कुटुंबियांवर एखाद्या आलेल्या अनुभवावर क्रांतीचे रील्स असतात. याचशिवाय पती समीर वानखेडे यांच्या विषयीच्या अभिमाना स्पद पोस्ट, त्यांचे दौरेही ती शेयर करते. 

क्रांती रेडकर आणि समीर वानखेडे यांनी काही दिवसांपूर्वी नागपूर दौरा केला. त्यांनी नागपुरातील रेशिमबाग येथील स्मृती मंदिराला भेट दिली होती. तिथं त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचालक केशव हेडगेवार आणि गोळवलकर यांच्या समाधीवर जाऊन फुलं वाहिली आणि हात जोडले. त्यानंतर त्यांनी गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दिक्षाभूमी येथील अस्थिकलशाचे दर्शन घेत मध्यवर्ती स्मारकाची परिक्रमा केली आणि पुष्ण अर्पण करून अभिवादन केलं.

तिनं नुकताच एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओत ती सावजी मटणाचा आस्वाद घेताना दिसतेय. पण हे झणझणीत मटण खाताना तिची कशी अवस्था झाली हे व्हिडिओत सांगितलं आहे. क्रांतीच्या या व्हिडिओ नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

 

 

Read More
Tags
Loading...

Recommended