Video : रितेश देशमुखचा कानमंत्र म्हणाला, 'बायकोची बडबड सुरू झाली की चप्पल उचला आणि...'
अभिनेता रितेश देशमुख हा सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. सोशल मीडियावर तो त्याचे फोटोस शेयर करत असतो, त्याचबरोबर त्याचे आणि पत्नी जिनीलिया सोबतचे काही रिल्स व्हिडिओ शेयर करत असतो. चाहत्यांकडून देखील त्यांच्या या रिल्स व्हिडीओला खूप पसंती मिळते.
आता देखील रितेशनं त्याच्या इन्स्टाग्रामवर एक भन्नाट व्हिडिओ शेअर केला आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला.
रितेशनं त्याच्या इन्स्टाग्रामवर जो व्हिडिओ शेअर केला आहे त्यामध्ये तो कटकट करणाऱ्या पत्नीबद्दल सांगत आहे. तो सांगत आहे की, 'जर तुमची पत्नी तुमच्याबरोबर जास्त कटकट करत असेल, तर चप्पल उचला आणि ती घालून सरळ बाहेर जा. त्यापेक्षाकडे जास्त काहीही करण्याचा विचारही करू नका… नाहीतर नको ते होऊन बसेल', असं या व्हिडिओत रितेश सांगत आहे.
हा व्हिडीओ पाहून एकच हशा पिकला आहे.