शाहरुख खानच्या ‘जवान’मध्ये झळकतेय ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री

By  
on  

शाहरुख खानच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘जवान’ या चित्रपटाची खुप उत्सुकता चाहत्यांमध्ये  आहे.  एक मोशन पोस्टर नुकतंच प्रदर्शित झाले. या पोस्टरमध्ये शाहरुख खानच्या संपूर्ण शरीरावर पट्ट्या बांधलेल्या पाहायला मिळत आहे. त्याच्या या मोशन पोस्टरचे सर्वत्र कौतुक होत आहे.

विशेष म्हणजे शाहरुख खानच्या ‘जवान’ या चित्रपटात एक मराठमोळी अभिनेत्री झळकणार आहे. तिने स्वत: इन्स्टाग्रामवर  याबद्दलची माहिती दिली . “गेली दोन वर्ष गाळलेला घाम, अश्रू आणि रक्त… अखेर माझा चित्रपट, आपला चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार”, असे कॅप्शन तिने या फोटोला दिले.

 

.

 

ही अभिनेत्री म्हणजे जाहिरातींचा प्रसिध्द चेहरा आणि अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये झळकणारी आपली- मराठमोळी गिरीजा ओक. गिरीजाने केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टवर अनेक कलाकारांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

‘जवान’ ७ सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Read More
Tags
Loading...

Recommended