चिमुकल्या मायराचं हिंदीत पदार्पण; ह्या मालिकेत झळकतेय मुख्य भूमिकेत

By  
on  

परी म्हणून बालकलाकार  मायराची माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत खुप महत्त्वपूर्ण भूमिका होती. मालिका संपली असली तरी विविध माध्यमातून परी चाहत्यांच्या भेटीस येते . सोशल मिडीयावर परी फेम मायराचा खुप मोठा चाहता वर्ग आहे.

 

 

फक्त सामान्य प्रेक्षकच नाही तर अनेक सेलिब्रिटीसुध्दा तिचे चाहते आहेत. विविध गेटअप्से मधले, ट्रेंडींग गाण्यावर थिरकतानाचे मायराचे व्हिडीओ खुप व्हायरल होतात. 

 

 

आता मायरा एका मराठी नाही तर हिंदी मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे.

 

काही दिवसांपूर्वीच मायरा छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार असल्याची माहिती समोर आली होती. 'चला हवा येऊ द्या' या शोमध्ये मायरा विनोदी भूमिकेत झळकणार आहे.

मायरा लवकरच हिंदी मालिकेत झळकणार असून या मालिकेचा प्रोमो नुकताच समोर आला आहे.

 

या मालिकेचं नाव 'नीरजा एक नई पेहचान' असं असून कलर्स वाहिनीवर लवकरच ही मालिका सुरु होणार आहे.

Read More
Tags
Loading...

Recommended