सातारी नेत्यांची नेतेगिरी नडली, अभिजीत बिचुकले नॉमिनेशनच्या उंबरठ्यावर

By  
on  

‘बिग बॉस मराठी २’ च्या घरातील पहिला दिवस सदस्यांचं एका बाबीवर एकमत झालं ते म्हणजे अभिजीत बिचुकलेना नॉमिनेट करायचं. अभिजीतने कालपासून या ना त्या कारणाने घरात लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. याशिवाय त्याच्या मनात महिलांविषयी असलेला अनादर वेळोवेळी दिसून आला आहे. याशिवाय किचनमध्येही बिचुकले, नेहा शितोळे, वीणा जगताप आणि रुपाली भोसले यांच्यात लादी पुसण्यावरून खडाजंगी झाली. त्यामुळे काल गोड गोड वाटत असलेले अनेकांचे शब्द आज काहीसे बोचरे वाटत आहे.

https://twitter.com/ColorsMarathi/status/1133015959713779712

बिचुकलेनंतर नॉमिनेशनसाठी सगळ्यांच्या रडारवर आहे शिव ठाकरे. घरात एंट्री घेतल्यानंतर रुपाली आणि शिवमधील झालेला वादही याला काहीसा कारणीभूत असावा. पण बिचुकलेंच्या नावावर नॉमिनेशन करण्यबाबत मात्र एकमत आहे. त्यामुळे बिचुकलेंचं भवितव्य काय असणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

https://www.instagram.com/p/Bx-CVQOgI48/?utm_source=ig_web_copy_link

Read More
Tags
Loading...

Recommended