प्रेक्षकांची ही लाडकी मालिका लवकरच संपणार? पाहा तुमची आवडती मालिका आहे यात

By  
on  

मालिका विश्वात मालिका सुरु होण्याचं किंवा संपण्याचं सत्र सतत सुरु असतं. आता प्रेक्षकांची आणखी एक लाडकी मालिका रसिकांचा निरोप घेणार असल्याच बोललं जात आहे. सध्या झी मराठीवरील काही मालिका रसिकांचा निरोप घेणार असल्याचं बोललं जात आहे. यापैकी तुला पाहते रे आणि माझ्या नव-याची बायको या मालिका निर्णायक टप्प्यावर आल्या आहेत. यापैकी तुला पाहते रे मालिका लवकरच रसिकांचा निरोप घेणार असल्याचं बोललं जात आहे. या मालिकेत आता रोमांचक वळण आलं आहे.इशाला तिचं अस्तित्व म्हणजेच राजनंदिनीचा पुनर्जन्म आहे हे समजलं आहे. आता विक्रांतला शिक्षा आणि सरंजामेंना न्याय मिळवून देण्यासाठी तिची धडपड सुरु आहे. याप्रमाणे इशाचा सुड पुर्ण झाला की ही मालिका रसिकांचा निरोप घेईल असं बोललं जात आहे. विशेष म्हणजे सुबोध भावेंनीही एका मुलाखतीमध्ये ही बाब स्पष्ट केली होती. त्यामुळे इशा-विक्रांतची कथा लवकरच रसिकांचा निरोप घेईल.

 

Read More
Tags
Loading...

Recommended