‘बिग बॉस’च्या घरात आता घडणार चोरीचं प्रकरण, नक्की कोण आहेत हे चोर

By  
on  

‘बिग बॉस’च्या घरात आता कुठे खरी रंगत येऊ लागली आहे. दरवेळी वेगवेगळे टास्क मिळाल्याने सदस्यांमध्येही चुरस वाढताना दिसत आहे. आता बिग बॉसच्या घरात नवीन टास्क सुरु होणार आहे. याचं नाव आहे ‘चोर बाजार’. यामध्ये टीम ए आणि टीम बी आहेत. यातील एक टीम चोर असेल तर दुसरी टीम चोर बाजारातील दुकानदार आणि पोलिस असणार आहेत.

[video width="480" height="270" mp4="https://marathi.peepingmoon.com/wp-content/uploads/2019/06/WhatsApp-Video-2019-06-04-at-8.45.59-PM.mp4"][/video]

यामध्ये चोर असलेल्या टीमने दुकानदार आणि पोलिसांच्या वस्तू चोरून दुकानदारांना विकायच्या आहेत. पोलिस यामध्ये चोरांना रोखतील. टीम ए चे सदस्य चोर असतील तर बी चे तीन सद्स्य दुकानदार तर चार सदस्य पोलिस असतील. संदेश वाचल्यावर ड्रेस, बेड्या आणि पॉईंट्स स्टोअर रूममधून घ्यावेत. आता या खेळात खरी मजा येईल. चोरी करण्यात ए टीमचे चोर यशस्वी होणार का? की टीम बी चे पोलिस त्यांना पकडणार हे लवकरच समजेल.

Read More
Tags
Loading...

Recommended