सुयोग-मिताली ही फ्रेश जोडी 'आम्ही बेफिकर' सिनेमाद्वारे लवकरच रसिकांच्या भेटीला

By  
on  

मराठी सिनेमांमधून नेहमी नवनवीन जोड्या प्रेक्षकांसमोर येतात. त्यातल्या काही जोड्या प्रचंड लोकप्रियही होतात. नव्या दमाच्या कलाकारांमधली अशीच एक नवी आणि फ्रेश जोडी आता लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. सुयोग गोऱ्हे आणि मिताली मयेकर ही युवा कलाकरांची केमिस्ट्री 'आम्ही बेफिकर' या आगामी सिनेमात पाहायला मिळणार आहे.

हरिहर फिल्म्सच्या नागेश मिश्रा, अंतरिक्ष चौधरी, कविश्वर मराठे आणि रोहित चव्हाण यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे तर रोहित पाटील हे या सिनेमाचे सहनिर्माते आहेत.'आम्ही बेफिकर' सिनेमाचं दिग्दर्शन कविश्वर मराठे यांचं आहे. खूप काही मिळवण्याचा प्रयत्नात खूप काही गमावले आणि त्याच गमावलेल्या अनुभवातून पुन्हा स्वप्न रंगवले या आशयसूत्रावर हा सिनेमा बेतला आहे. आजच्या तरुणांशी संवाद साधण्याचा, त्यांच्या मनातले विचार पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न यात करण्यात आला आहे.

सुयोग आणि मिताली आजवर मालिका-सिनेमांतून आपल्यापुढे आले आहेत. मात्र, 'आम्ही बेफिकर' हा त्यांचा एकत्रित पहिलाच सिनेमा आहे. नव्या दमाचे कलाकार आणि नव्या पिढीचा विषय मांडणारा हा सिनेमा नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीला उतरेल. सर्वांवनाच या सिनेमाची प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे.

Read More
Tags
Loading...

Recommended