Photos: 'सैराट'च्या परशाला अशी कुणी मुलगी दिसली तर नक्की कळवा

By  
on  

सैराट सिनेमामुळे घराघरांत पोहचलेला अभिनेता आकाश ठोसर हा अनेक सिनेमा आणि वेबसिरीजमधून प्रेक्षकांच्या समोर येतो. बराच काळ तो कुठल्याही प्रोजेक्टमधून समोर आला नसला तरी सोशल मिडीयावर तो खुप एक्टीव्ह असतो आणि चाहत्यांसोबत नेहमीच संपर्कात राहतो. कधी वर्कआऊटचे व्हिडीओ असो किंवा त्याने केलेलं नवं फोटोशूट असो किंवा कधी कुठे भटकंतीला गेला असो, तो सर्वकाही शेअर करतो. 

आकाशसारखा तरुण आणि हँडसम अभिनेत्यासाठी तरुणी नेहमी घायाळ होतात, पण नुकतंच त्यांच्या हदयाचा ठोका चुकवणारे आकाशचे काही फोटो पाहायला मिळाले, तेही आकाशच्या इन्स्टाग्रामवर. आकाशने एका मुलीसोबत फोटो पोस्ट केले आहेत. म्हणजे, अर्थातच तो एन्गेज झाला असं तुम्हाला वाटणं साहजिकच आहे. 

अहो, ही आकाशसोबत दिसणारी मुलगी दुसरी-तिसरी कुणी नसून चक्क तो आकाशच आहे. ही सारी किमया आहे फेस  अॅपची. मध्यंतरी या अॅपमुळे क्रिकेटर्सचे महिला वेषातले लुक तुफान व्हायरल झाले होते. 

तशाच प्रकारच्या अ‍ॅपच्या माध्यमातून आकाशने आपले चार वेगवेगळे महिला वेषातील फोटो बनवले आणि आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केले.

 

 

आहे का कुणी अशी? असेल तर सांगा!! असं कॅप्शन देत आकाशने  धम्माल उडवून दिली आहे. 

 

आकाशच्या या धम्माल  फोटोंवर नेटक-यांनी कॉमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे. 

Read More
Tags
Loading...

Recommended