पाहा Video : प्रार्थना बेहेरेने या अभिनेत्यासोबत असा केला होता रोमँटिंक डान्स

By  
on  

सोशल मिडीयावर लॉकडाउन सुरु झाल्यापासून थ्रोबॅक पोस्टचा ट्रेंड सुरु आहे. यात मनोरंजन विश्वातील कलाकार त्यांचे थ्रोबॅक फोटो, व्हिडीओ पोस्ट करत आहेत. यातच अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने देखील तिचा एक थ्रोबॅक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत प्रार्थना डान्स करताना दिसतेय.

मितवा सिनेमादरम्यानचा हा एका कार्यक्रमातील व्हिडीओ आहे. या व्हिडीओत प्रार्थना रोमँटिक डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओत प्रार्थनासोबतअभिनेत अंकुश चौधरी दिसतोय. अंकुश आणि प्रार्थनाचा हा रोमँटिक डान्स सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#memories #throwback #mitwaa

A post shared by Prarthana (@prarthana.behere) on

प्रार्थना आणि अंकुश ही जोडी सिनेमांमध्ये आत्तापर्यंत एकत्र दिसली नसली तरी या व्हिडीओत या दोघांची रोमँटिक केमेस्ट्रि पाहायला मिळतेय. 'मितवा' सिनेमातील 'वेड्या मना' या गाण्यावर दोघांनी डान्स केला आहे. 

'मितवा' सिनेमात अभिनेता स्वप्निल जोशी, सोनाली कुलकर्णी आणि प्रार्थना बेहेरे हे कलाकार झळकले होते.

Read More
Tags
Loading...

Recommended