प्रार्थना बेहेरेला या अभिनेत्यासोबत पुन्हा काम करण्याची आहे इच्छा, शेयर केली ही आठवण

By  
on  

'तुझ्या विना मरजावा' या सिनेमात अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि अभिनेता विकास पाटील झळकले होते. याच सिनेमाच्या चित्रीकरणाच्या पहिल्या दिवसाला सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. याच निमित्ताने प्रार्थनाने एक खास पोस्ट शेयर केली आहे. विकाससोबतच्या मैत्रीला आणि सिनेमाच्या चित्रीकरणाला सहा वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ही पोस्ट आहे. 

प्रार्थना या पोस्टमध्ये लिहीते की, "हे विकू, सहा वर्षे झाली जेव्हा आपण तुझ्या विना मरजावाच्या निमित्ताने पहिल्यांदा भेटलो होतो. आपली मैत्री आणि बाँड वेळेसोबत वाढत गेलं. आपल्या शुटच्या पहिल्या दिवसाचा फोटो शेयर करतेय आणि आता तुला बघीतलं तर तू खुप लांबपर्यंत आला आहेस. पूर्वीपेक्षा देखणा दिसत आहेस. असच चालू राहू दे. तुला आयुष्यासाठी खुप शुभेच्छा. आणि आता लवकरच काम करू."

या पोस्टसोबत प्रार्थनाने विकासचे काही हँडसम लुक फोटोही पोस्ट केले आहेत.

 

 याशिवाय विकासनेही या सिनेमाच्या चित्रीकरणाच्या आठवणी शेयर करणारी पोस्ट केली आहे. विकासनेही प्रार्थनासोबतचे काही फोटो पोस्ट केले आहेत. या सिनेमानंतर ही जोडी पुन्हा स्क्रिनवर एकत्र दिसली नाही. 

प्रार्थनाच्या पोस्टमधून तिने पुन्हा विकाससोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Read More
Tags
Loading...

Recommended