Grazia Millennial Awards 2019 : रंगारंग सोहळ्यात रेड कार्पेटवर अवतरल्या या मराठी तारका

By  
on  

Grazia Millennial Awards 2019 या सोहळ्यात बॉलीवूडसोबत अनेक मराठी तारे तारकांनी हजेरी लावली. या तारे तारकांमध्ये मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या श्रिया पिळगावकर, राधिका आपटे, अमृता खानविलकर या तीन तारका या आलिशान सोहळ्यात अत्यंत सुंदर दिसत होत्या. 

अमृता खानविलकरने 'राझी' सिनेमात स्वतःच्या अभिनयाची चुणूक दाखवून बॉलीवूडचं लक्ष वेधून घेतलं. या सोहळ्यात अमृता ग्लॅमरस ग्लिटरी गेटअपमध्ये  सुंदर दिसत होती. 

श्रिया पिळगावकरने 'फॅन' सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. या सोहळ्यात श्रियाचा कॉर्पोरेट गेटअप सर्वांचं लक्ष वेधून घेत होता.

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत कार्यरत असणारी हरहुन्नरी अभिनेत्री म्हणजे राधिका आपटे. या सोहळ्यातील तिचा फ्लोरल गेटअप अत्यंत आकर्षक दिसत होता. 

अमृता सध्या 'जिवलगा' या मालिकेत महत्वपूर्ण भूमिका  साकारत आहे. 

श्रियाने 'मिर्झापुर' या वेबसीरिजमधून वेगळी भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकली. 

राधिका आपटेने २०१८ साली 'अंधाधुन', 'बाजार', 'पॅडमॅन' आदी सिनेमांमधून स्वतःच्या अभिनयाची छाप पडली. तसेच 'लस्ट स्टोरीस', 'घुल' यांसारख्या वेबसीरिजमध्ये सुद्धा राधिका झळकली होती. 

 

श्रिया लवकरच 'बीचम हाऊस' या आंतराष्ट्रीय प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Read More
Tags
Loading...

Recommended