PeepingMoon Exclusive: ठरलं तर ! या दिवशी विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे अडकणार लग्नबंधनात
मराठी मालिकाविश्वातील प्रसिध्द कलाकार अभिनेत्री शिवानी रांगोळे आणि अभिनेता विराजस कुलकर्णी यांच्या अफेअरच्या चर्चा नेहमीच रंगल्या. पण त्यांनी आपलं प्रेम कधीच लपून ठेवलं नाही.खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो..याप्रमाणेच शिवानी आणि विराजस नेहमीच एकत्र स्पॉट व्हायचे. कधी एकमेकांच्या मालिकांच्या सेटवर जमायचे तर कधी मित्र-मंडळींसोबत एकत्र धम्माल करताना पाहायला मिळायचे. नव्या वर्षात या जोडीने आपल्या नात्यावर अधिकृत असं शिक्कामोर्तब केलं आहे. आता लवकरच ही जोडी लग्नबंधनात अडकतेय.
अलिकडेच शिवानी आणि विराजसने एका जाहिरातीसाठी लग्नाचा सीन शूट केला होता. तेव्हा त्यांनी गुपचूप लग्न केलं की काय..अश चर्चांना खुप उधाण आलं होतं. पण जाहिरातीचं शूटींग म्हणजे त्यांच्या ख-या लग्नापूर्वीची एक रंगीत तालीमच म्हणावी लागेल.
पिपींगमून मराठीला एक्सक्ल्युझिव्हरित्या विराजस आणि शिवानीच्या रिसेप्शन सोहळ्याचं निमंत्रण मिळालं आहे. त्याची ही पहिली झलक. ७ मे २०२२ रोजी विराजस आणि शिवानी या सेलिब्रिटी जोडीचा लग्न सोहळा पुण्यात पार पडणार आहे.
चाहत्यांसह संपूर्ण मराठी सिनेसृष्टीचं लक्ष या बहुप्रतिक्षीत लग्नसोहळ्याकडे लागलं आहे.