Peepingmoon Exclusive : 'मी शुटींग बंद करेन' म्हणत सिद्धार्थ जाधववर संतापले होते महेश मांजरेकर ; मकरंद अनासपुरेंनी सांगितला 'तो' किस्सा

By  
on  

दे धक्का प्रचंड यशानंतर तब्बल १४ वर्षांनी या सिनेमाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यात अतरंगी जाधव कुटुंबाची लंडनमध्ये झालेली धमाल मजामस्ती प्रेक्षकांना पाहता येणार आहे. याच निमित्ताने सिनेमातील मकरंद जाधव म्हणजेच मकरंद अनासपुरे यांनी पिपिंगमून मराठी सोबत खास गप्पा मारल्या.

यावेळी शूटींगदरम्यान सिद्धार्थ जाधवच्या शॉपिंगवरुन एक रंजक किस्सा घडला होता. त्यावरुन महेश मांजरेकर हे सिद्धार्थवर संतापल्याचा भन्नाट किस्सा मकरंद अनासपुरे यांनी पिपिंगमून सोबत शेयर केला.

दे धक्का २ सिनेमाचं शूटिंग लंडनमध्ये सुरू असताना रस्त्यावर सिनेमाचा सेट लागला होता. त्यादिवशी सकाळीच सिद्धार्थ जाधवने सगळ्यांच्या आधी जाऊन सेटवर हजेरी लावली होती. तेव्हा त्याने महेश मांजरेकर यांच्या पायाला हात लावून नमस्कार वगैरे केला आणि नंतर ऐन शॉटच्या वेळी सिद्धार्थ जाधव सेटवर सिद्धार्थचं नाही आणि मग नंतर लक्षात आलं सक्षमही नाही. मग शोधाशोध, पळापळ सुरु झाली. सिद्धार्थचा फोनही लागत नव्हता." 

पुढे मकरंद अनासपुरे यांनी सांगितले की, "सगळीकडे शोधाशोध सुरू असतानाच एकजण मॉलमध्ये गेला, त्यावेळी सिद्धार्थ सक्षमला शूज दाखवत होता. हे कसं वाटतं, ते कसं वाटतंय, असं तो विचारत होता. यानंतर दोघेही सेटवर आले. यावेळी गर्दीत सिद्धार्थला महेश मांजरेकर दिसताच त्याने हातातल्या बॅगा खाली टाकल्या आणि नंतर महेश सर खूप भडकून म्हणाले ‘मी शूटिंग बंद करेन' असा अफलातून किस्सा मकरंद अनासपुरे यांनी सांगितला.

Read More
Tags
Loading...

Recommended