Peepingmoon Exclusive : राखी सावंत आणि आदिल दुरानीचा गुपचुप झाला निकाह

By  
on  

बिग बॉस मराठी सीझन 4 हा यंदाचा सीझन अनेक कारणांनी चर्चेत होता. त्यापैकी महत्त्वाचं कारण म्हणजे चॅलेंजर म्हणून बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत. राखीने यंदाच्या सीझमध्ये खुप राडे केले. तिच्या अनेक कुरापतींमुळे हा सीझन चर्चेत होता. या सीझनमध्ये फॅमिली वीकला सगळ्यांच्या घरुन आई-वडील, बहिण असे कोणी ना कोणी आले होते, राखीला भेटायला तिचा बॉयफ्रेंड आदिल आला होता. याच आदिलने तममा प्रेक्षकांचं लक्ष वेधू घेतलं होतं. राखीच्या या बॉयफ्रेंडची बिग बॉस मराठीचे होस्ट महेश मांजरेकर यांनीसुध्दा स्तुती केली. 

आता राखीच्या लग्ननाची एक्सक्ल्युझिव्ह बातमी समोर येत आहे. फोटो वायरल होत आहे.  तिने निकाह स्वरुपात लग्न केलं आहे. पण तिने हे लग्न बिग बॉस मराठीच्या घरात जाण्यापूर्वी केलं की बाहेर आल्यावर याचा उलगडा अद्याप झाला नाहीय. 

 राखी सावंत टॉप ५ स्पर्धकांमध्ये होती. पण तिने ९ लाख रुपये घेत विजेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तिथे तिचा गेम ओव्हर झाला. पण घरातून बाहेर पडल्यावर तिच्या आईला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केल्याचं तिला कळलं. आता राखी संपूर्ण वेळ तिच्या आईला देत त्यांची काळजी घेताना दिसत आहे.

Read More
Tags
Loading...

Recommended