PeepigmoonMarathi Exclusive : दिग्ददर्शक संजय जाधव नव्या टीमसह घेऊन येतायत नवा सिनेमा?

By  
on  

मराठी सिनेसृष्टीत नवनव्या विषयांचे नवनव्या धाटणीचे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात.  कधीकधी एखाद्या फोटोसह किंवा पोस्टरसह सिनेमाची अचानक एखादी घोषणा होते व आपल्या आवडीचे कलाकार एकत्र एका फ्रेममध्ये पाहून आपल्याला त्या प्रोजेक्टविषयी उत्सुकता लागून राहते. अशीच उत्सुकता नुकत्याच समोर आलेल्या एका फोटोमुळे शिगेला पोहचली आहे. पिपींगमून मराठीच्या हाती प्रसिध्द कलाकारांचा एक धमाकेदार सेल्फी लागला आहे, त्यामुळे नव्या सिनेमाच्या चर्चांना उधाण आलं आहे. 

मराठी इंडस्ट्रीतले प्रसिध्द दिग्दर्शक संजय जाधव, प्रसिध्द अभिनेत्री अमृता खानविलकर, अभिनेता हरिश दुधाडे, महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम  अभिनेता ओंकार भोजने यांच्यासह मराठी बिग बॉस फेम जय दुधाणे, तेजस्विनी लोणारी आणि सोशल मिडीयावर प्रचंड प्रसिध्द असणार जस्ट नील फेम नील अशी ही कलाकारांची नवी टीम एका नव्या सिनेमासाठी एकत्र जमली आहे. या प्रोजेक्टविषयी खुप उत्सुकता आहे. पण सिनेमा काय आहे, विषय कसा आहे आहे याबाबतची सर्व माहिती अद्याप गुलदस्त्यात आहे. 

या आगामी सिनेमाचं शुटींग येत्या मार्च 2023 पासून होत आहे. 

 

 

हा प्रोजेक्ट नेमका कसा असेल, लव्ह स्टोरी असेल की कॉमेडी कि कौटुंबिक सिनेमा, शुटींग भारतात होणार की परदेशात या सर्वांची उत्तर लवकरच पुढच्या अपडेटमध्ये समोर येतील. तोपर्यंत मात्र आपल्याला वाट पाहावी लागेल. 

Read More
Tags
Loading...

Recommended