PeepingMoon Exclusive: साजिद नाडियडवाला यांचा अक्षय कुमार व अहान शेट्टीसोबत कुठलाही सिनेमा अद्यापतरी नाही

By  
on  

बाॅलिवूडचा खिलाडी कुमार अक्षयसोबत अनेक बड्या निर्मात्यांचे कोलाब्रेशन असते आणि धमाकेदार सिनेमातून ते बाॅक्स आॅफिसवर धुमाकूळ घालतात. आज सकाळीच हासफुल या पाॅप्युलर सिरीजचे निर्माते साजिद नाडियादवाला अक्षय कुमार आणि आहान शेट्टी यांना घेऊन सिनेमा करतायत अशा बातम्या धडकल्या. लवकरच याची अधिकृत घोषणा होईल असंही या बातम्यांमध्ये म्हटलं गेले. परंतु पिपींगमूनच्या हाती आलेल्या एक्सक्ल्युझिव्ह वृत्तानुसार साजिद नादियाडवाला एन्ड ग्रॅण्डसन अशा कोणत्याही सिनेमाची निर्मिती करत नाहीत. त्यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे.अद्यापतरी साजिद असा कुठलाच सिनेमा करत नाहीत किंवा तसा सिनेमाचा विचारही करत नाहीत. 

साजिदने अक्षय कुमारसोबत आजतायागत 10 सिनेमे केले  आहेत. त्यापैकी त्यांचा आगामी बच्चन पांडे अजून प्रदर्शित झालेला नाही. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 

Read More
Tags
Loading...

Recommended