PeepingMoon Exclusive: दिलीप कुमार यांच्या निधनाचं वृत्त कळताच सायरा बानो म्हणाल्या...

By  
on  

बॉलिवूडचे  ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन झालं आहे. सकाळी ७.३० वाजता हिंदूजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या ९८ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. दिलीप कुमार यांच्या पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो या त्यांच्यासोबत सावलीसारख्या होत्या. त्यांची मनोभावे त्या सेवा करायच्या. शेवटच्या श्वासापर्यंत त्या दिलीपजींच्यासोबत होत्या. जेव्हा सायराजींना पतीच्या निधनाचं वृत्त खळलं तेव्हा  त्या स्तब्ध झाल्या. हिंदुजा रुग्णालयाचे वरिष्ठ डॉक्टर पारकर यांनी जेव्हा सायराजींना ही दुखद वार्ता सांगितली तेव्हा त्यांचे शब्द होते, देवाने माझ्या जगण्याचं कारणच हिरावून घेतलं. दिलीप साहब यांच्याशिवाय मी काहीच विचार करु शकत नाही. कृपया सर्वजण प्रार्थना करा. 

दिलीप सहाब यांना संपूर्ण सन्मानात आणि शासकीय इतमामात अंतिम निरोप देण्यात येणार आहे. सांताक्रूझ येथील बाबा कसाई कब्रिस्तान येथे त्यांचं दफन करण्यात येणार आहे. यावेळी करोना काळातील नियमांचं तंतोतंत पालन करण्यात येणार आहे

 

 

पाच दशकांहून अधिक बॉलिवूड करिअरमध्ये दिलीप कुमार यांनी ‘मुगल-ए-आजम’, ‘देवदास’, ‘नया दौर’, ‘राम और श्याम’ असे अनेक सुपरहिट चित्रपट दिले. ‘मुगल-ए-आजम’ मधील सलीमप्रमाणेच ‘देवदास’ चित्रपटातील त्यांचा अभिनय आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करतो. त्यांच्यासारखा नट होणे नाही. 

 

Read More
Tags
Loading...

Recommended