PeepingMoon Exclusive: मनिष मल्होत्रा करतोय त्याच्या पहिल्या सिनेमाचं दिग्दर्शन, धर्मा प्रोडक्शनची असेल निर्मिती

By  
on  

एक मोठी बातमी नुकतीच समोर येत आहे. प्रसिध्द फॅशन डिझाईनर मनिष मल्होत्रा हा आता सिनेविश्वात पदार्पण करतोय. तो त्याच्या पहिल्या-वहिल्या सिनेमाचं दिग्दर्शन करतोय. त्याच्या ह्या पदार्पणाच्या सिनेमाची निर्मिती करतोय त्याचा बेस्ट फ्रेंड करण जोहर . पिपींगमूनला मिळालेल्या एक्सक्ल्युझिव्ह वृत्तानुसार मनिष मल्होत्रा एक म्युझिकल लव्हस्टोरी घेऊन येणार आहे. 

धर्मा प्रोडक्शनच्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, सिनेमाची कथा आणि पटकथा ही दोन्ही मनिष मल्होत्रानेच लिहली आहेत. त्यानंतर ती प्रोडक्शन हाऊसने इतिहासकाराच्या मदतीने पुढे सविस्तर नेली आहे. ही स्क्रिप्ट अत्यंत इंटरेस्टिंग असून या प्रोजेक्टशी निगडीत प्रत्येकजण हा उत्साहित आहे. खासकरुन मनिष आणि करण जोहर. 

 

प्रसिध्द अभिनेत्रींचे कॉश्चयुम डिझाईन करण्यासोबतच  मनिष मल्होत्राने करणच्या अनेक सुपरहिट सिनेमांसाठी कॉश्च्युम डिझाईन  केले आहेत. 1995 साली प्रदर्शित झालेला काजोलचा दिलवाले दुल्हनियामधले विविध क्लासिक लुक मनिषनेच डिझाईन केले तसेच रंगीला सिनेमातले उर्मिलाचे कॉश्चुमसुध्दा मनिषनेच डिझाईन केले. हे दोन्ही सिनेमे सुपरहिट ठरले. त्यानंतर धर्मासाठी मनिषने पुन्हा एकदा जबरदस्त काम केलं ते कुछ कुछ होता है सिनेमासाठी. हा सिनेमा आणि यातली फॅशन ही तरुणाईमध्ये लोकप्रियच ठरली नाही तर या कपड्यांची जबरदस्त क्रेझ होती. 
 

Read More
Tags
Loading...

Recommended