Peepingmoon Exclusive: रात्री झोपण्यापुर्वी सिद्धार्थ अस्वस्थ होता, वाचा काय घडलं त्या रात्री....

By  
on  

बिग बॉस 13 चा विनर आणि अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं आज हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. सिद्धार्थच्या अशा अचानक जाण्याने अनेक प्रश्न समोर आले आहेत. यामध्ये असं समोर आलं आहे की, सिद्धार्थची कथित गर्लफ्रेंड शहनाजही सिद्धार्थसोबत त्याच्या 12व्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये होती. त्याला अस्वस्थ वाटू लागताच तिने सिद्धार्थच्या आईची मदत मागितली.

 

त्यांनी सिद्धार्थला बाम लावला आणि पेनकिलर दिली. त्यानंतर सिद्धार्थला बेडरुममध्ये झोपायला लावलं. सकाळी शहनाज सिद्धार्थला उठवण्यासाठी बेडरुममध्ये गेली असता. तिला तो प्रतिसाद देत नसल्याच आढळलं. शहनाज त्याला उठवण्याचा प्रयत्न करत असतानाच त्याचे बहीण आणि तिचे पती तिथे पोहोचले.  सगळ्यांनी सिद्धार्थला कूपर हॉस्पिटलमध्ये नेलं तिथे त्याला डॉक्टारांनी मृत घोषित केलं.

Read More
Tags
Loading...

Recommended