PeepingMoon Exclusive: अटकेच्या भितीने लपली आहे रिया चक्रवर्ती ? पटना पोलीसांना दिलेल्या पत्त्यावर नाही सापडली रिया

By  
on  

पटना पोलीसद्वारे सुशांत सिंह राजपूत प्रकरणात एफ आय आर दाखल केल्यानंतर आता या प्रकरणाती तपासाचा वेग वाढला आहे. सुत्रांच्या माहितीनुसार पटना पोलीस रियाच्या चौकशीसाठी सांगीतलेल्या पत्त्यावर पोहोचली होती. मात्र त्यांना माहिती मिळाली की ती आणि तिचा परिवार तिथे नाही.सुत्रांच्या माहितीनुसार रिया चक्रवर्तीचा शोध घेत असलेल्या पटना पोलिसांना रियाच्या एका फ्लॅटचा पत्ता माहिती आहे, याच पत्त्यावर जेव्हा पोलीस पोहोचले तेव्हा त्यांना तिकडे रिया सापडली नाही. आणि आता पटना पोलीस दुसऱ्या ठिकाणाची माहिती घेत आहेत. सुत्रांचं असही म्हणणं आहे की या प्रकरणात मुंबई पोलिसांकडून ज्या मदतीची अपेक्षा होती ती मिळत नाहीय.  प्रकरणाचा तपास घेत आता बिहार पोलीसांनी स्पष्ट केलं आहे की सुशांत प्रकरणात पटनामध्ये झालेली एफआयआर कॉपी मुंबई पोलीसांना न देता त्यांचा तपास वेगळा ठेवणार आहेत. पटनाचे आयजी आणि एसएसपी या केसची देखरेख करत आहेत.

 सुशांतच्या वडिलांच्या तक्रारीनुसार पटनाच्या राजीन नगर पोलीसांनी कलम 341, 342, 280, 420, 406, 420 आणि 306 नुसार रिया आणि तिच्या परिवारासह सहा लोकांना आरोपी बनवलं आहे. यासोबतच पटनाहून चार पोलीसांची टीम मुंबईत दाखल झाली आहे. आत्तापर्यंत या प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीसोबत कित्येक मोठ्या लोकांची चौकशी करण्यात आली आहे.

14 जूनला सुशांत मुंबईच्या बांद्रामधील त्याच्या फ्लॅटमध्ये मृत अवस्थेत सापडला होता. त्याच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये अभिनेता सुशांतचं निधन गळफास लावून घेतल्याने झालं असल्याचं समोर आलं होतं.

Read More
Tags
Loading...

Recommended