Exclusive: दीपिकाच्या चौकशी दरम्यान उपस्थित राहण्याची पती रणवीरने मागितली परवानगी

By  
on  

 अभिनेता रणवीर सिंगने दीपिका पदुकोणच्या चौकशीवेळी तिच्यासोबत उपस्थित राहण्यासाठी विनंती केली आहे. नार्कोटिक्स ब्युरो येत्या शनिवारी म्हणजेच 26 तारखेला दीपिकाची ड्रग्ज प्रकरणात चौकशी करणार आहे. 
दीपिका आणि रणवीर या चौकशीसाठी नुकतेच गोव्याहून मुंबईला रवाना झाले आहेत. NCB ला दिलेल्या अर्जात रणवीर म्हणतो की दीपिका कधी कधी तणावात जाते. त्यामुळे तिला पॅनिक अ‍टॅक येतात. त्यामुळे रणवीरला दीपिकासोबत राहण्याची परवानगी दिली जावी. 

या अर्जात रणवीर म्हणतो की, ‘तो एक कायद्याचं पालन करणारा नागरिक आहे. त्यामुळे दीपिकाच्या चौकशीवेळी तो उपस्थित राहू शकत नाही.’ पण रणवीरने या अर्जात विनंती केली NCB च्या कार्यालयात जाण्याची परवानगी मिळावी. अजून त्याला परवानगी संदर्भात कोणतीही बातमी समोर आलेली दिसत नाही. 

Read More
Tags
Loading...

Recommended