कार्तिकी गायकवाड आणि आदर्श शिंदे पहिल्यांदाच आले एकत्र ‘सपान लागलं’ साठी!

By  
on  

लहानपणापासूनच संगीतक्षेत्रात प्रसिद्ध असलेली गायिका म्हणजे कार्तिकी गायकवाड. २००८ साली तिने सा रे ग म प लिटिल चॅम्प्स चे विजेतेपद पटकावले आणि तिच्या व्यावसायिक पार्श्वगायनाची सुरुवात झाली. शास्त्रीय संगीताचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेली कार्तिकी हे मराठी संगीतक्षेत्रातील मोठे नाव आहे आणि हे नाव तिने लहान वयातच कमावले आहे, सध्या ती सा रे ग म प लिटिल चॅम्प्स च्या जजच्या भूमिकेत दिसतेय. आता कार्तिकी गायकवाड पहिल्यांदाच म्युझिक अल्बम साठी गाणं गातेय. ‘सपान लागलं’ असं त्या गाण्याचं शीर्षक असून यात ती पहिल्यांदाच आदर्श शिंदे सोबत गाणं गाताना दिसणारेय.

सर्वस्व एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘सपान लागलं’ ह्या मराठी अल्बम सॉंग चे पोस्टर नुकतेच आळंदी येथे कार्तिकी गायकवाड यांच्या हस्ते अनावरीत करण्यात आले. सर्वस्व एंटरटेन्मेन्ट च्या बॅनरखाली ‘सपान लागलं’ हा म्युझिक व्हिडीओ बाजारात येत असून यात ‘डॉक्टर डॉक्टर’ फेम ओंकार परदेशी रोमँटिक अवतारात दिसणार आहे नवोदित तारका रुची कदम सोबत. रुची कदम ही सोशल मीडिया स्टार असून या व्हिडिओत ज्ञानेश्वरी गायकवाड सुद्धा झळकणार आहे. 

सुप्रसिद्ध गायिका कार्तिकी गायकवाड आणि आदर्श शिंदे यांनी पहिल्यांदाच माईक शेयर केलाय ‘सपान लागलं’ साठी. अभिनेता आणि गीतकार ओंकार परदेशी यानेसुद्धा गाण्यात भाग घेतला असून याचे संगीत दिलंय संगीतकार अनिल काकडे यांनी. सिद्धेश सानप यांनी या म्युझिक व्हिडीओचे दिग्दर्शन केलेय.

Read More
Tags
Loading...

Recommended