अजयच्या स्वरातील ‘मळवट’ गोंधळ लोकप्रियतेच्या शिखरावर

By  
on  

नवरात्रीच्या मुहूर्तावर आलेला अजय गोगावले यांच्या आवाजातील ‘मळवट’ हा ‘सोयरीक’या आगामी मराठी चित्रपटातील गोंधळ रसिकांमध्ये चांगलाच लोकप्रिय झाला आहे.‘अदिती म्युझिककंपनी’च्या वतीने प्रदर्शित  झालेल्या ‘मळवट’ च्या गोंधळाने अल्पावधीतच १५ लाखांचा टप्पा ओलांडला आहे.यल्लमा देवीचा जागर या गाण्यातून करण्यात आला आहे.हा गोंधळ गीतकार वैभव देशमुख यांनी लिहिला असून संगीतकार विजय गवंडे यांनी संगीतबद्ध केला आहे.या गोंधळालामिळालेल्या यशाबद्दल अदिती म्युझिकचे सर्वेसर्वा विजय शिंदे यांनी आनंद व्यक्त केला. या यशाचा आनंद‘सोयरीक’ चित्रपटाच्या टीमने केक कापून साजरा केला.

मकरंद माने लिखित-दिग्दर्शित ‘सोयरीक’हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विजय शिंदे, शशांक शेंडे आणि मकरंद माने यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.‘नाईंटीनाईन प्रोडक्शन्स’ आणि ‘बहुरूपी प्रोडक्शन्स’ ची निर्मिती असलेल्या कौटुंबिक धाटणीच्या या मनोरंजक चित्रपटात अनेक नामवंत कलाकारांची मांदियाळी आपल्याला पहायला मिळणार आहे.

Read More
Tags
Loading...

Recommended