कोळीगीतांचे बादशाह काळाच्या पडद्याआड, लोकशाहीर काशीराम चिंचय यांचे निधन

By  
on  

कोळीगीत सातासमुद्रापार लोकप्रिय करणारे सुप्रसिद्ध लोकशाहीर काशीराम लक्ष्मण चिंचय यांचे निधन झाले़. उपचारादरम्यान केइएम रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  सुप्रसिद्ध लोकशाहीर म्हणून काशीराम लक्ष्मण चिंचय यांना ओळखले जाते. कोळीगीतांचे ते बादशाह आहेत. काशिराम हे डोल डोलतंय वाऱ्यावर माझी, डोंगराच्या आडून एक बाई चांद उगवला, वेसावची पारू, हिच काय गो गोरी गोरी पोरी , सन आयलाय गो यांसारख्या गीतांचे ते गीतकार होते. 

विजय कठीण आणि काशीराम चिंचय हे दोघे सोबत गाणी बनवायचे. त्यांच्या सर्व कॅसेट “वेसावकर आणि मंडळी” या नावाने व्हीनस कंपनीने प्रसिद्ध केल्या होत्या. भारतातच नव्हे तर सातासमुद्रापार त्यांची आगरी कोळी गाणी पोहचली होती. त्यांच्या गाण्यांवर हळदी-लग्नसमारंभात एकच जल्लोष व्हायचा. 

 

आज दुपारी त्यांच्यावर वेसावे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहे.

Read More
Tags
Loading...

Recommended