अभिनेता सुशांत शेलारच्या गाडीवर दगडफेक, Video आला समोर

By  
on  

मराठी सिनेविश्वात खळबळ माजवणारी एक घटना नुकतीच घडली आहे. प्रसिध्द अभिनेता  सुशांत शेलार यांच्या गाजीवर दगडफेक करण्यात आली आहे.  या दगडफेकीचा व्हिडिओ समोर आला आहे. मध्यरात्री २ च्या सुमारास अज्ञातांनी पार्किंगमध्ये असलेल्या गाडीवर हल्ला केल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतं. या प्रकरणी एका अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

या प्रकरणी माध्यमांशी बोलताना सुशांत शेलार म्हणाले, "15 मे रोजी मध्यरात्री दोन च्या सुमारास अज्ञातांनी माझ्या गाडीवर दगडफेक केली. पण त्यांनी हे का केलं हे अद्याप समजलेलं नाही. या प्रकरणाची मी रीतसर तक्रार करणार आहे. "

Read More
Tags
Loading...

Recommended