Photos : भर लग्नमंडपात राणादाने केलं पाठकबाईंना किस, पाहा खास क्षण !

By  
on  

महाराष्ट्राची लाडकी जोडी म्हणजेच पाठकबाई आणि राणादा हे दोघंही लग्नबंधनात अडकले. कुटुंबीय, मित्रपरिवार व नातेवाईंकांच्या उपस्थितीत सप्तपदी घेत राणादा-पाठकबाई म्हणजेच अक्षया देवधर व हार्दिक जोशी ही जोडी आयुष्यभरासाठी एकमेकांची झाली.  त्यांच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यात राणादाने पाठकबाईंना लग्नविधी सुरु असताना किस करतानाचा फोटो प्रचंड लक्ष वेधून घेत आहे. या किसचा किस्सा सर्वत्र  लोकप्रिय झाला आहे. 

 अक्षया आणि हार्दीकचा शाही अंदाज पहायला मिळाला. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये दोघेही खूप आनंदी दिसत आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून हा विवाह खूप चर्चेत होता. लग्न समांरंभातीसल प्रत्येक अपडेट सोशल मीडियावर अजूनही धुमाकूळ घालतोय. 

 

गेल्या अनेक दिवसांपासून अक्षया देवधर व हार्दिक जोशीच्या लग्नाची जय्यत तयारी सुरू होती. मेहंदी, हळदी व संगीत सोहळ्यातील फोटोही प्रचंड व्हायरल झाले आहेत. आता त्यांच्या लग्न सोहळ्यातील फोटोंनी चाहत्याचं लक्ष वेधून घेतले आहे. 

Read More
Tags
Loading...

Recommended