Video : राखी सावंत म्हणते, मेरी शादी खतरें मैं है !

By  
on  

राखी सावंत म्हणजे एंटरटेन्मेन्ट एंटरटेन्मेन्ट आणि एंटरटेन्मेट. यंदा बिग बॉस मराठी सीझन 4 चं घर राखीने गाजवलं. चॅलेंजर्स म्हणून घरात आलेल्या राखीने आपल्या कारनाम्यांनी घर तर दणाणून टाकलंच पण त्याचबरोबर सदस्यांच्या नाकेनऊ आणले. आता बिग बॉस मराठीच्या घराबाहेर पडलेली राखी आदिलशी निकाह केल्यामुळे बरीच चर्चेैत आहे. तसं तर लाईमलाईटमध्ये राहण्याचा राखीचा नेहमीच अट्टाहास असतो, त्यासाठी ती कुठलीही पातळी गाठायला नेहमीच तयार असते. आता आदिलने त्यांचं लग्न झालं असल्याचं कबुल केलं. अशातच ती गरोदर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. यावर खुद्द तिनेच स्पष्टिकरण देत या बातमीला दुजोरा दिला होता. 

आता राखीने तीन-चार दिवसांपूर्वीच आपल्या आईला गमावलंय. राखीवर दुखाचा डोंगर कोसळलाय. यातच आता पुन्हा एक नवं संकंटं तिच्यासमोर उभं ठाकलंय. आता राखी सावंतचा एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये अभिनेत्री मुंबईच्या भर रस्त्यात ढसाढसा रडताना दिसून येत आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by @varindertchawla

प्रसिद्ध सेलिब्रेटी फोटोग्राफर विरल भयानीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर राखीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये राखी पापाराझींसोबत बोलतांना आणि भररस्त्यात रडतांना दिसून येत आहे. अभिनेत्री कॅमेऱ्यासमोर आपलं दुःख व्यक्त करत आहे. राखी म्हणत आहे,' माझं लग्न धोक्यात आहे. मला माझं लग्न वाचवायचं आहे. कोणाला काय मिळतं माझ्या संसारात मध्ये मध्ये करून. लग्न म्हणजे मजाक नाही. माझं लग्न मला वाचवायचं आहे.' तिच्या या व्हिडिओवर आता अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by @varindertchawla

आता राखी आणि आदिलमध्ये पुन्हा काय झालं याबाबत सगळे तर्क-वितर्क लावत आहेत, यामागचं कारण राखीने स्पष्ट केलेलं नाही. 

Read More
Tags
Loading...

Recommended