'स्वामी माझी आई' म्युझिक व्हिडीओ प्रेक्षकांच्या भेटीला, झळकतेय देवमाणूस फेम डिंपल

By  
on  

भक्तांच्या हाकेला धावणाऱ्या  आणि 'भिऊ नकोस..मी तुझ्या पाठीशी आहे’, असे अभिवचन भक्तांना देणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकटदिन नुकताच  संपन्न झाला. स्वामींचा आभास सदैव सोबत असतो, परंतु सहवास नेहमी असेल की नाही सांगता येत नाही म्हणून तर आई आणि आईची माया, आईची साथसोबत त्यांनी प्रत्येकासोबत जोडली. स्वामींच्या  प्रकट दिनाचे औचित्य साधून 'स्वामीरुपी 'आई' ची  महती सांगणाऱ्या  'स्वामी माझी आई' या  मराठी म्युझिक व्हिडीओची निर्मिती  ‘आनंदी वास्तू’ने केली आहे.  यात देवमाणूस फेम डिंपल म्हणजेच अभिनेत्री अस्मिता देशमुख यात झळकतेय. 

आई केवळ पोटातून जन्म देणारी किंवा रक्ताचे नाते नसून आई ही ईश्वराचा अंश असते. आपला सांभाळ करणारी, मायेने खाऊ घालणारी, आयुष्याला योग्य वळण देणारी,  संस्कार घडवणारी व्यक्ती म्हणजेच आई… 'स्वामी माझी आई'   या मराठी म्युझिक व्हिडीओच्या माध्यमातून अशाच ‘स्वामीरुपी आई’ ह्या भावनेचं दर्शन घडणार आहे.  

 

 

'स्वामी माझी आई'  या  म्युझिक व्हिडीओची निर्मिती ‘आनंदी वास्तू’  यांनी केली  असून   ओंकार हनुमंत माने यांचे लेखन -दिग्दर्शन आहे. सौ अश्विनी आनंद पिंपळकर,  आनंद पिंपळकर (वास्तुतज्ञ, ज्योतिर्विद) हे निर्माते आहेत.  आनंद पिंपळकर, झी मराठी वरील ‘देवमाणूस’  मालिकेतील अस्मिता देशमुख, कलर्स वरील “योग योगेश्वर जय शंकर” मालिकेतील बालकलाकार आरुष बेडेकर, ‘आलंय माझ्या राशीला’ चित्रपटातून घराघरात पोहोचलेला प्रणव पिंपळकर या  कलाकारांच्या  अभिनयाने  हा  व्हिडीओ साकार झाला आहे.  

 

 

मराठी सोबत दाक्षिणात्य चित्रपटात आपल्या स्वरांनी मने जिंकणारा पार्श्वगायक अभय जोधपूरकर याचा स्वरसाज गाण्यांना  लाभला असून प्रसाद प्रभाकर शिंदे यांनी  हा  म्युझिक व्हिडीओ संगीतबद्ध केला आहे.  विशेष  म्हणजे   म्युझिक व्हिडीओसाठी  मतिमंद व अनाथ शाळेतील मुलांना  सहभागी करून घेत  समाजप्रबोधन करण्याचा प्रयत्न निर्माते  आनंद पिंपळकर यांनी केला आहे.  

माणूस कितीही संकटात, अडचणींमध्ये असला तरी स्वामींच्या आशीर्वादाचा विश्वास हा प्रत्येकाच्या स्मरणात कायम असतो हाच विश्वास  ' स्वामी माझी आई' या म्युझिक व्हिडीओमधून प्रत्ययास  येतो.

Read More
Tags
Loading...

Recommended