सईच्या ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’ सिनेमाचं नवीन पोस्टर रिलीज

By  
on  

सई ताम्हणकरच्या हातात आता अनेक विविधांगी विषयावरील सिनेमे आहेत.  त्यातीलच एक म्हणजे ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे’. गजेंद्र अहिरे दिग्दर्शित हा सिनेमा वेगळ्या वाटेवरचा असल्याचं बोललं जात आहे. या सिनेमाचं आणखी एक पोस्टर समोर आलं आहे. या पोस्टरमध्ये सई बेंचवर बसून आईस्क्रीम खाताना दिसत आहे. आयुष्यात ‘नाती’ या शब्दाला खूपच महत्त्व असतं पण प्रत्येकाची ती निभवायची पद्धत वेगळी असते.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sai Tamhankar (@saietamhankar) on

 

याच आशयावर हा सिनेमा बेतला आहे. सईसोबत या सिनेमात कोण असणार याची उत्सुकताही या पोस्टरमध्ये कायम राहिली आहे.  स्मिता फिल्म प्रॉडक्शन प्रस्तुत आणि गजेंद्र अहिरे दिग्दर्शित ‘कुलकर्णी चौकातला देशपांडे सिनेमाची निर्मिती स्मिता विनय गानू यांनी केली आहे. तर सहनिर्मिती अजित पोतदार आणि सीमा अलापे यांनी केली आहे. हा सिनेमा 22 नोव्हेंबरला संपुर्ण महाराष्ट्रात रिलीज होणार आहे.

 

 

Read More
Tags
Loading...

Recommended